Arms act कलम २४ : केंद्र शासनाच्या आदेशान्वये सक्तीने ताब्यात घेणे किंवा अडकवून ठेवणे :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम २४ :
केंद्र शासनाच्या आदेशान्वये सक्तीने ताब्यात घेणे किंवा अडकवून ठेवणे :
एखादी व्यक्ती कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा आपल्या कब्जात ठेवण्यास या अधिनियमांच्या किंवा त्या त्या काळी अंमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्यांच्या आधारे हक्कदार असली तरी, केंद्र शासन, कोणत्याही वेळी आ व्यक्तीच्या कब्जातील कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा सक्तीने ताब्यात घेण्याचा आदेश देऊ शकेल, आणि सार्वजनिक शांतता व सुरक्षितता यासाठी त्यास आवश्यक वाटेल अशा कालावधीपर्यंत ती अडकवून ठेवू शकेल.

Leave a Reply