Arms act कलम २४ख(ब) : १.(शांतताभंग झालेली क्षेत्रे, इत्यादीमधील सार्वजनिक ठिकाणे किंवा त्यामधून अधिसूचित शस्त्रे घेऊन जाण्यास मनाई :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम २४ख(ब) :
१.(शांतताभंग झालेली क्षेत्रे, इत्यादीमधील सार्वजनिक ठिकाणे किंवा त्यामधून अधिसूचित शस्त्रे घेऊन जाण्यास मनाई :
१) कोणत्याही क्षेत्रातील सार्वजनिक शांततेचा आणि प्रशांततेचा भंग झाला आहे किंवा अशा शांततेला निकटवर्ती धोका निर्माण झाला आहे याबाबत आणि अशा क्षेत्रात शस्त्रांच्या वापराचा अंतर्भाव असलेल्या अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी तसे आवश्यक किंवा समयोचित आहे याबाबत केंद्र शासनाची खात्री झाली असेल अशा बाबतीत, ते शासन, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे-
(a)क)(अ) अशा क्षेत्राच्या मर्यादा विनिर्दिष्ट करू शकेल ;
(b)ख)(ब) अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीत (असा कालावधी म्हणजे ती अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेनंतरच्या दुसऱ्या दिवसाच्या आधीची नाही अशी तारखेपासून सुरू होणारा कालावधी असेल्न), कोणत्याही व्यक्तीने, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात आले असेल अशा वर्णनाची कोणतीही शस्त्रे (अशा प्रकारे विनिर्दिष्ट केलेल्या शस्त्रांना या कलमात यापुढे अधिसूचित शस्त्रेङ्क म्हणून निर्दिष्ट केले आहे ) अशा क्षेत्रातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणामधून किंवा त्यामध्ये घेऊन जाता कामा नयेत किंवा अन्यथा कब्जात ठेवता कामा नयेत असे निदर्शित करू शकेल.
(c)ग) (क)अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा, केंद्र शासनाच्या किंवा राज्य शासनाच्या अखत्याराखालील अधिकाऱ्याला ;
एक) अशा क्षेत्रातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी असलेल्या किंवा त्यामधून जाणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडे अथवा त्या ठिकाणामधील किंवा त्याचा भाग असलेल्या कोणत्याही परिवास्तूत अथवा त्या ठिकाणामध्ये असलेल्या किंवा त्यामधून जाणाऱ्या कोणत्याही प्राण्याजवळ किंवा जलयानात किंवा वाहनात कोणत्याही स्वरूपाच्या वाहतुकीच्या अन्य साधनात अथवा त्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही पात्रात किंवा कोणत्याही स्वरूपाच्या इतर कोणत्याही आधानकात कोणतीही अधिसूचित शस्त्रे लपवण्यात आलेली आहेत असे मानायला त्याला कारण असल्यास, अधिसूचनेत विनिर्दिष्ट केला असेल अशा कलावधीत कोणत्याही वेळी अशी व्यक्ती किंवा अशी परिवास्तू किंवा असा प्राणी किंवा असे जलायन, वाहन किंवा वाहतुकीचे अन्य साधन किंवा असे पात्र किंवा अन्य आधानक यांची झडती घेण्यासाठी;
दोन) अशा क्षेत्रातील कोणत्याही सार्वजनिक ठिकाणामधून किंवा ठिकाणी कोणतीही व्यक्ती नेत असलेली किंवा अन्यथा तिच्या कब्जात असलेली अगर पोटकलम (एक) खाली झडतीत सापडलेली कोणतीही अधिसूचित शस्त्रे, अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा कालावधित, कोणत्याही वेळी हस्तगत करून अधिसूचनेत विनिर्दिष्ट करण्यात आलेल्या कालावधित ती अडकवून ठेवण्यासाठी;
प्राथिकृत करू शकेल.
२) कोणत्याही क्षेत्राच्या संबंधात पोटकलम (१) खाली काढलेल्या अधिसूचनेमध्ये विनिर्दिष्ट करावयाचा कालावधी प्रथमत: नव्वद दिवसांपेक्षा जास्त असणार नाही, मात्र अशा क्षेत्रात, पोटकलम (१) मध्ये निर्दिष्ट केल्याप्रमाणे सार्वजनिक शांततेचा आणि प्रशांततेचा असा भंग किंवा त्याचा निकटवर्ती धोका चालू आहे आणि अशा क्षेत्रात शस्त्रांच्या वापराचा अंतर्भाव असलेल्या अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक किंवा समयोचित आहे असे केंद्र शासनाचे मत असल्यास, ते शासन असा कलावधी वेळोवेळी, कोणत्याही एका वेळी जास्तीत जास्त नव्वद दिवसांच्या कोणत्याही कालावधीने वाढविण्यासाठी अशी अधिसूचना विशोधित करू शकेल.
३) फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ (१९७४ चा २) यामधील, झडती आणि अभिग्रहण याच्यासंबंधाचे उपबंध, पोटकलम (१) खाली केलेल्या कोणत्याही झडतीला किंवा अभिग्रहणाला शक्य तितपत लागू होतील.
४) या कलमाच्या प्रयोजनासाठी —
(a)क)(अ) शस्त्रे यामध्ये दारूगोळ्याचा समावेश होतो;
(b)ख)(ब) सार्वजनिक ठिकाण म्हणजे, लोकांच्या किंवा कोणत्याही लोकवर्गाच्या वापरासाठी उद्देशित असलेले किंवा त्यांना प्रवेशसुलभ असलेले कोणतेही ठिकाण होय.
(c)ग) (क)मूलत: पोटकलम (१) खाली काढलेल्या कोणत्याही अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेला कोणताही कालावधी पोटकलम २) अन्वये वाढविण्यात आला असेल अशा बाबतीत, अशा अधिसूचनेच्या संबंधात, पोटकलम (१) मधील अधिसूचनेत विनिर्दिष्ट केलेला कालावधी हा निदेॅश म्हणजे अशा प्रकारे वाढविण्यात आलेल्या कालावधीचा निर्देश होय असा त्याचा अर्थ लावण्यात येईल.)
——–
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ७ द्वारा (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply