शस्त्र अधिनियम १९५९
कलम २३ :
शस्त्रे, इत्यादींसाठी जलयाने, वहाने यांची झडती :
कोणताही दंडाधिकारी, कोणताही पोलीस अधिकारी किंवा केंद्र शासनाने याबाबतीत विशेषकरून शक्ती प्रदान केलेला अन्य कोणताही अधिकारी याला अधिनियमाचे, किंवा त्या अन्वये केलेल्या नियमांचे कोणत्याही प्रकारे व्यतिक्रमण करण्यात येत आहे किंवा होण्याचा संभव आहे किंवा कसे याबाबत खातरजमा करून घेण्यासाठी, कोणतेही जलायन, वाहन, किंवा वाहतुकीचे अन्य साधन थांबवता येईल व त्याची झडती घेता येईल आणि त्यात सापडतील अशी कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा असे जलयान, वाहन किंवा वाहतुकीचे अन्य साधन यांसह सक्तीने ताब्यात घेता येईल.