शस्त्र अधिनियम १९५९
कलम २० :
संशयास्पद परिस्थितीत शस्त्रे, इत्यादी नेणाऱ्या व्यक्तींना अटक करणे :
जेव्हा एखादी व्यक्ती कोणतीही शस्त्रे किंवा दारूगोळा – मग तो लायसनाच्या कक्षेत असो अथवा नसो – अशा रीतीने किंवा अशा परिस्थितीत बराबेर बाळगून असल्याचे किंवा नेत असल्याचे आढळून येईल की, जेणेकरून ती शस्त्रे किंवा दारूगोळा कोणत्याही बेकायदेशीर प्रयोजनार्थ वापरण्याच्या उद्देशाने तिने बरोबर बाळगली असावीत किंवा त्यासाठी ती वापरली जातील अशा संशयास रास्त आधार मिळत असेल तेव्हा, कोणताही दंडाधिकारी, कोणताही पोलीस अधिकारी किंवा अन्य कोणताही लोकसेवक अथवा रेल्वे, वायूयान, जलयान, वाहन किंवा वाहतुकीचे अन्य कोणतेही साधन या ठिकाणी नेमलेली किंवा काम करणारी कोणतीही व्यक्ती, तिला अधिपत्रविना अटक करून तिच्याकडून अशी शस्त्रे किंवा दारूगोळा सक्तीने ताब्यात घेऊ शकेल.