शस्त्र अधिनियम १९५९
कलम १६ :
लायसनाची फी (शुल्क) इत्यादी :
किती फी (शुल्क) दिल्यावर कोणत्या शर्तीच्या अधीनतेने व कोणत्या नमुन्यात लायसन मंजूर करण्यात येईल किंवा त्याचे नूतनीकरण करण्यात येईल या गोष्टी विहित करण्यात येईल त्याप्रमाणे असतील :
परंतु, निरनिराळ्या प्रकारच्या लायसनांकरिता निरनिराळ्या फी, निरनिराळ्या शर्ती व निरनिराळे नमुने विहित करता येतील :
परंतु आणखी असे की, लायसनात विहित असेलेल्या शर्तीशिवाय आणखी, लायसन प्राधिकरणास कोणत्याही विवक्षित बाबतीत आवश्यक वाटतील अशा अन्य शर्तीचा समावेश असू शकेल.