Site icon Ajinkya Innovations

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ कलम ८ : राष्ट्रीयत्व ठरवणे :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम ८ :
राष्ट्रीयत्व ठरवणे :
१) जेव्हा एखादी विदेशी व्यक्ती ही एकापेक्षा अधिक विदेशी राष्ट्रांच्या कायद्यानुसार राष्ट्रिक म्हणून ओळखली जात असेल किंवा एखाद्या विदेशी व्यक्तीला एखादे राष्ट्रीयत्व द्यावयाचे तर ते कोणते द्यावे हे काही कारणास्तव ठरविता येत नसेल तेव्हा, हितसंबंध किंवा सहानुबंध या दृष्टीने ती विदेशी व्यक्ती त्या त्या काळी ज्या देशाशी सर्वाधिक निकटसंबंधित आहे असे विहित प्राधिकरणास वाटेल त्या देशाची अथवा तिचे राष्ट्रीयत्व अनिश्चित असेल तर, तिचे त्याप्रमाणे लगतपूर्वी ज्या देशाशी संबंध होते त्या देशाची ती राष्ट्रिक असल्याचे मानता येईल :
परंतु, जेव्हा एखाद्या विदेशी व्यक्तीस जन्माने एखादे राष्ट्रीयत्व प्राप्त झालेले असेल तेव्हा, केन्द्र शासनाने सरसकट किंवा एखाद्या विशिष्ट प्रकरणी तसे निदेशित केल्यास तेवढे खेरीजकरुन एरव्ही, त्या व्यक्तीचे मूळचे राष्ट्रीयत्व कायम आहे असे मानण्यात येईल-मात्र त्या दिवशी व्यक्तीने त्यानंतर नागरिकीकरणाद्वारे किंवा अन्यथा दुसरे एखादे राष्ट्रीयत्व प्राप्त करुन घेतलेले आहे व अशा रीतीने तिने ज्या देशाचे राष्ट्रीयत्व प्राप्त करुन घेतलेले आहे त्या देशाच्या शासनाकडून संरक्षण मिळण्यास पात्र म्हणून ती अजूनही ओळखली जात आहे असे त्या व्यक्तीने उक्त प्राधिकरणाचे समाधान होईल अशा प्रकारे शाबीत केल तर गोष्ट अलाहिदा.
२) राष्ट्रीयत्वासंबंधी पोटकलम (१) अन्वये दिलेला निर्णय अंतिम राहील आणि त्याला कोणत्याही न्यायालयात आक्षेप घेता येणार नाही :
परंतु, केन्द्र शासन स्वत: होऊन किंवा संबंधित विदेशी व्यक्तीने अर्ज केल्यावरुन, असा निर्णय बदलु शकेल.

Exit mobile version