Site icon Ajinkya Innovations

कलम १ : संक्षिप्त नाव व विस्तार :

विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
१.(१९४६ चा अधिनियम क्रमांक ३१)
विदेशी व्यक्तींबाबत केन्द्र शासनाला विवक्षित शक्ती प्रदान करण्यासाठी अधिनियम.
ज्या अर्थी, भारतात विदेशी व्यक्तींचा प्रवेश, तेथे त्यांची उपस्थिती व त्यांचे तेथून प्रयाण यासंबंधीच्या शक्तींचा केन्द्र शासनाने वापर करण्यासाठी काही उपबंध करणे समयोचित आहे;
त्याअर्थी, याद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियमित करण्यात येत आहे:-
कलम १ :
संक्षिप्त नाव व विस्तार :
१) या अधिनियमास विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६ असे म्हणता येईल.
२) त्याचा विस्तार संपूर्ण २.(***) ३.(भारतभर) आहे.
———
१. या अधिनियमाचा विस्तार-
१९६२ च्या विनियम क्रमांक १२ मधील कलम ३ आणि अनुसूचीद्वारे, गोवा, दमण आणि दीव या प्रदेशांवर; अधिसूचना क्रमांक सा.का.नि. १५५७, दिनांक २४-११-१९६२, भारत सरकारच्या राजपत्र भाग २, विभाग २(अ) पृष्ठ १८८६ द्वारे पांडिचेरीवर; तसेच हा अधिनियम १९६३ च्या विनियम क्रमांक ६ मधील कलम २ आणि अनुसूची १ द्वारे दादरा आणि नगर हवेलीवर; १९६५ च्या विनियम क्रमांक ८ मधील कलम ३ आणि अनुसूचीद्वारे (१-१०-१९६७ पासून) लक्षद्वीप, मिनिकॉय आणि अमीनदीवी बेटांवर; आणि अधिसूचना क्रमांक सा.का.नि. ४१(अ), दिनांक २७-१-१९७६ द्वारे (१-२-१९७६ पासून) सिक्कीम राज्यावर लागू करण्यात आला.
२. अनुकूलन आदेश १९५० द्वारा घालण्यात आलेले हैद्राबाद राज्य खेरीजकरुन हे शब्द १९५१ चा अधिनियम ३ याच्या कलम ३ आणि अनुसूची यांद्वारे गाळले.
३. १९४७ चा अधिनियम क्रमांक ३८ याच्या कलम २ द्वारा ब्रिटिश भारत याऐवजी समाविष्ट केले.

Exit mobile version