विदेशी व्यक्ती अधिनियम १९४६
कलम १४ :
१.(अधिनियमाच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास दंड :
जो कोणी ,-
(a)क) भारतात जारी केलेल्या व्हिसाच्या कालावधीपेक्षा अधिक काळ भारतात राहतो;
(b)ख) भारतात प्रवेश व वास्तव्यासाठी जारी केलेल्या वैध व्हिसाच्या अटींचे उल्लंघन करणारी कोणतीही कृती करतो;
(c)ग) या अधिनियमाच्या तरतुदींचा, त्याअंतर्गत केलेल्या कोणत्याही आदेशाचा किंवा त्या आदेशाच्या अनुषंगाने दिलेल्या कोणत्याही निर्देशांचा भंग करतो, आणि त्या उल्लंघनासाठी या अधिनियमात विशिष्ट शिक्षा नमूद केलेली नसेल तर, अशा व्यक्तीस पाच वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा होऊ शकेल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल, आणि अशा व्यक्तीने कलम ३ च्या पोटकलम (२) च्या खंड (च) यानुसार बंधपत्र करुन दिले असेल तर, तिचे बंधपत्र दंडपात्र होईल, आणि अशा बंधपत्राने बद्ध झालेल्या व्यक्तीला दंड भरावा लागेल, अथवा हा दंड तिला का भरावा लागू नये याबाबत, दोेषसिद्ध करणाऱ्या न्यायालयाचे समाधान होईल अशा प्रकारचे कारण दाखवावे लागेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, व्हिसा या शब्दाचा अर्थ पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम १९२० (१९२० चा ३४) अन्वये बनविलेल्या पासपोर्ट (भारतात प्रवेश) नियम १९५० यामध्ये दिलेल्या अर्थाप्रमाणेच असेल.)
——–
१. २००४ के अधिनियम क्रमांक १६ याच्या कलम २ द्वारा कलम १४ ऐवजी कलम १४, १४क, १४ख, १४ग समाविष्ट केले.
